Thursday, 29 September 2016

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। - संत तुकाराम महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरू ॥ १॥
पडिये देहभाव पुरवी वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ २॥
मागे पुढें उभा राहे सांभाळित । आलिया आघात निवरावे ॥ ३॥
योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करी धरूनियां ॥ ४॥
तुका म्हणे नाही विश्वासस ज्या मनीं । पाहावें पुराणी विचारूनी ॥ ५॥



 इंग्रजी तथा मराठी या दोन्ही भाषेतील निरुपणासमवेत

English  Meaning :-
How To Describe My Vithoba's Lover For Me? He Himself Hasbecome My Guide-Teacher|| 2||
He Fulfills My All Desires In Order To (Ultimately ) Take Me To Him || 2||
He Stands In Front Or Behind , And Protects, Takes Care Ofme|| 3||
He Takes Care Of My Needs And Shows Me The Right Path || 4||
Tuka Says That If You Don’t Believe In My This Statement, Read The Puranas For The Evidence|| 5||

Background Information For The Understanding This Abhanga:-

There Is A Famous Statement Insri,.Bhagavadgeeta
अनन्याश्चिंतयंतो मां ये जनापर्युपासते । तेषांनित्याभि युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥
Here The Lord Says That He Takes Care Of The Needs Of Thoseof His Disciples Who Have Totally Surrendered To Him. Andconsider He Is Their Whole And Sole Everything. Lord Also L9oves Such A Disciple And Takes Care Of Disciple's Earthly Needs .
Sant Tukaram Maharaj Is Such A Disciple Of The Lord. He Isdescribing The Experience Of Himself In This Abhanga .


In The First Stanza Of The Abhanga , Tukaram Maharaj Is Saying That He Can Not Describe How Much His Lord Loves Him. In Order To Explain The Point Tukaram Maharaj Says That Because Of Intense Love For Me, The Lord Himself Has Become My Spiritual Guide And Teacher. .
The Importance Of Spiritual Guide And Teacher Is Well Known .Any Person Who Is Desirous Of Liberation Has To Have Such A Spiritual Teacher. Swamisamartha Ramadasa Also Says That Even One Has Done Various Disciplines Followed Various Methods To Attain The Liberation, One Can Never Attain Same Without Getting The Blessings Of A Real Spiritual Teacher; Since Only He Removes Even A Small Trace Of “Ahankara Ie.The Feeling Of I ”. And Without The Complete Removal ;It Is Impossible To Get Liberation.

If We Take An Example Of The Saint Namadev Maharaj , This Point Gets Confirmation. Saint Namdev Could Talk With His Beloved Panduranga. God Would Eat The Offering Of Food From Sant Namadev. However He Had To Surrender To The Spiritual Teacher Sant Visoba Khecharji To Get The Real Knowledge And Liberation..

This Kind Of Teacher Just By Touch, Etc Can Give His Disciple The Coveted Fruit Of Liberation And True Knowledge. On Attaining Such Knowledge One Is Ever Immersed In Pure Bliss.This Is Called “ Shaktipata” In The Spiritual Language.

Sant Tukaram Maharaj In The Very First Stanza Says That He Was Blessed By Lord Himself. Lord Himself Became His Spiritual Teacher And Guide.

Balance Part Of The Abhanga Describes How The Lord Has Been Taking Care Of His Beloved Disciple Saint Tukarama ; In His Own Words.
Tukaram Maharaj Says That The Lord Fulfills All His ( Tukaramamaharaja's) Desires So As To Ensure That At The Time, Of Death There Will Be No Desire Left. ( We Have Already Seen That Themain Cause Of Birth Is Unfullfilled Desires.) One Who Has No Desires Left At The Time Of Death And Remembers The God , Is Naturally Liberated..

In The Next Three Stanzas Tukaram Maharaj Describes His Own Experiences By Saying That His Lord Takes Cars Of His All Needs, Protects Him In The Calamities, And Always Guides Him. One Who Has Totally Surrendered To The Lord Will Get This Kind Ofexperience.
Thus This Part Is The One ,Which Can Believed Since It Has Been Told By The Sait Sant Tuukarama Himself (A Liberated Person.)

However Sant  Tukaram Maharaj Knows That There Are Some Personswho Will Have Doubts.
For Convincing Such Persons Tukaram Maharaj Further Says That If You Do Not Believe In This ; Then Refer To Various Puranas In Which There Are Enough Evidences Recorded To Confirm This Statement.

Teachings Of The Abghanga:-

The Abhanga Tells Us That We Should Do All The Efforts For Getting The True Knowledge ( Who Am I ?) . All These Efforts Will Lead To Get Us A True Spiritual Guide Teacher. Until Then If Our Inner Voice Tells Us To Follow Any Specific Path; Then That Path Should Be Followed. As Saibaba Says The Belief And Readiness To Wait Willgive Us The Desired Results. -Dnyanda 

Marathi Version :-
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। आपणचि देव होय गुरू ॥ १॥
पडिये देहभाव पुरवी वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ २॥
मागे पुढें उभा राहे सांभाळित । आलिया आघात निवरावे ॥ ३॥
योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करी धरूनियां ॥ ४॥
तुका म्हणे नाही विश्वासस ज्या मनीं । पाहावें पुराणी विचारूनी ॥ ५॥

अभंगामागची भूमिका :-
श्रीमद्‍ भगवद्‍गीतेमधे खालील प्रसिद्ध श्लोक आपल्याला माहीत आहे.
अनन्याश्चिंतयंतो मां ये जनापर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥

ह्या श्लोकामधे भगवंतांनी हेच सांगितले आहे की त्यांना शरणाग अनन्य भक्तांचा योगक्षेम तेच पाहातात कारण अशा भक्ताला फक्त भगवंताशिवाय दिसरे कांही दिसत नाहीदुसरे कांहीच सुचत नाहीम्हणून अशा भक्ताच योगक्षेम भगवंत स्वत:च भक्तावरच्या अतीव प्रेमामुळे चालवतो.
संत तुकाराम महाराज असेच पांडुरंगाचे भक्त आहेतह्या अभंगामधे त्यांनी स्वता:चाच अनुभव वर्णन केलेला आहे.
अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :-
तुकाराम महाराज पहिल्याच चरणामधे म्हणतात की माझा विठोबा माझ्यावर किती प्रेम करतो हे सांगताच येणार नाहीमी सदगुरू शोधीत होतो तर स्वत:च माझा सदगुरू झाला.

अध्यात्मामधे सदगुरुंचे महत्व अनन्यसाधारण आहेसमर्थ रामदास स्वामी पण म्हणतात
न जाणतां कोटीवरी । साधने केली परोपरीं । तरी मोक्षासी अधिकारी । होणार नाही ॥
असो जयासि मोक्ष व्हावा । तेणें सदगुरू करावा । सदगुरुविण मोक्ष पावावा। हे कल्पांती न घडें ॥

म्हणजेच कितीही प्रयत्न केलेकितीही साधना जसे उपासतापासव्रते,तीर्थयात्रापूजा इत्यादी केली तरी ब्रह्मज्ञान होत नाहीखरे ज्ञान व्हावे ह्यासाठी सदगुरू भेटणे अत्यंत आवश्यकच असते.

संत नामदेव महाराजांचे चरीत्र पाहिले की हा भाग कळतोसंत नामदेव विठोबाशी बोलायचेदेव त्यांच्या हातचे जेवण जेवायचा पण शेवटी नामदेवांनासुद्धा विसोबाखेचरांकडे ब्रह्मज्ञानासाठी जावे लागले.

सद‍गुरु शक्तिपात करून आपल्या शिष्याला ब्रह्मज्ञान करून देतातअसे ज्ञान झाले की भक्त व भगवंताचचे ऐक्य होतेजन्ममृत्यूचक्र संपतेशाश्वत आनंद व समाधान मिळतेह्यालाच सायोज्यमुक्ति म्हणतात.
संत तुकाराम महाराजांच्यासाठी " त्यांच्यावरील प्रेमामुळे स्वतभगवंतच त्यांचे सदगुरू झाले थेत व म्हणून ते जीवन्मुक्त झालेहे येथे महाराज सांगताहेत.
पुढच्या सर्व चरणामधे महाराज भगवंत त्याचा योगक्षेम कसा चालवतो आहे ते वर्णन करताहेत.
महाराज म्हणतात की माझ्या सर्व ईच्छा भगवंत ह्यासाठी पुरवतोकी माझी कोणतीही वासना मृत्यूसमयी शिल्लक राहू नये. (वासनाक्षय झाल्याने परत जन्म नाही हा पण अध्यात्मातला एक मुख्य सिद्धांत आहे.)
महाराज पुढे हे पण म्हणतात की भगवंत त्यांना सांभाळतोत्यांच्यावर येणारी संकटे दूर करतो व एवढेच नाही तर योग्य मार्ग दर्शन पण करतो आहे.

प्रभूशरणागत प्रत्येकालाच असा अनुभव येत असतोहा भाग विश्वासाचा आहे.महाराज म्हणतात की लोकहो तुमचा विश्वास बसत नसेल तर पुराणांतली उदाहरणे पाहाम्हणजे मी सांगतो त्यावर तुमचा विश्वास बसेल.

अभंगाची शिकवण :-
ह्या अभंगातून हेच स्पष्ट होते की खरे ज्ञान होण्यासाठी ( मी कोण आहे ? )आपण आपले सर्व प्रयत्न निष्ठापूर्वक केले पाहिजेतयोग्य वेळी सदगुरुंची भेट होईलचतो पर्यंत साईबाबा सांगतात त्याप्रमाणे श्रद्धा व सबूरीने प्रयत्न करत रहायचे. - ज्ञानदा 

- RADHARANIJI.BLOGSPOT.IN

जास्तीत जास्त स्नेहीजणांच्या पर्यंत संत साहित्य निरुपण पोहचवा .

Tuesday, 27 September 2016

तुजलागीं माझा जीव जाला पिसा । - संत तुकाराम महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णु ||

तुजलागीं माझा जीव जाला पिसा । अवलोकिंतो दिशा पांडुरंगा ॥ १ ॥
सांडिला व्यवहार माया लोकाचार । छंद निरंतर हाचि मनीं ॥ २॥
आइकिलें कांनी तें रुप लोचन । देखावया सीण करिताती ॥ ३॥
प्राण हाविकळ होय कासाविस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥ ४॥
तुका म्हणें आता कोण तो उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥ ५॥

इंग्रजी व मराठी भाषेत अभंगाचे  निरुपण पुढीलप्रमाणे

VerbatimMeaning :-
O,my lord Panduranga, I have become mad and I am searching you everywhere || 1 ||
Only one desire is left in my mind now and that is to behold your form. For this purpose I have abandoned everything ,all my worldly duties. || 2||
I have heard about your form , ( How you look, or appear) and My eyes have become tired from the effort to search and see you.
|| 3||
Like a fish out of water ,who desires nothing but water; I am also desirous to see you only || 4||
Sant Tukaram Maharaj  says what should I do ; so that I will behold your form. ?|| 5||

Background Information for this Abhanga :-

Every disciple of God wants only to behold the God . How I will see Him is the only thought such a person has. The reason for this is the feeling of certainty the God is there and only He can make me free from all the sufferings. There not only the feeling of certainty but also there is very intense love too , in the mind of such a disciple. BhagvadgIta addresses this certainty 9in the second chapter. ( Chgapter 2- verse 16) . A real disciple has this certainty as well as love fully blossomed in his heart.
When such a disciple reaches the state described in this Abhanga then is certain that he will soon see , behold his God. If we examine Sant  Tukaram Maharaja's biography , we can see that Sant Tukarama maharaj when He was in such a state has written this abhanga.

Meaning of the Abhanga :-

Sant Tukaram maharaj is asking his Lord that O 'my lord Panduranga, I am searching for you in every direction like a mad person.For beholding your form, I have abandoned all my worldly duties . My mind only desires of Beholding you. I do not know how you appear, but I have heard about your appearance ( How you look etc) .( We all know that there are a number of Poems in which different poets have described the Lord. So also the Bhagavatam, Bhagavad Gita describe How the Lord is.)

Sant Tukaram Maharaj further says that I am unable to behold you and because of this , my eyes have become tired. My condition is like a fish out of water. I want only you and nothing but you.

At the end , Tukaram Maharaj says prays to Lord. He says that O'Lord please tell me What should I do?

Teachings Of the Abhanga :-


This Abhanga enables us to examine the state of our mind. It enables us to examine whether we are really desiring to behold the Lord ? In the path of spirituality it is very important to have such a self examination. This examination only enables to change our attitude and pushes us to put forward our efforts with concentrated mind.
-        - Dnyanda


 Below given is the Marathi version  for the same explaination
शब्दार्थ :-

हे देवा पांडुरंगा , माझा जीव तुझ्याकरता वेडा झाल्याने मी दाही दिशांस तुला शोधतो आहे ॥ १॥
आता माझ्या मनांत फक्त तुझे दर्शन व्हावे हाच एकच छंद उरला आहे,लोकव्यवहाराचा मी त्याग केला आहे ॥ २॥ 
तुझ्या स्वरूपाचे जे वर्णन मी ऐकलें आहे तेच रूप दिसावे ह्याच्यासाठी माझे डोळे लागले आहेत व ( तू न दिसल्यामुळे ते थकले आहेत). ॥ ३॥
पाण्यावाचून मासा जसा तळमळतो तसेच माझा प्राण तुझ्या दर्शनाकरतां तळमळत आहे ॥ ४ ॥ 
संत तुकाराम महाराज म्हणतात  की ज्या योगे तुझे दर्शन होईल असा कोणता उपाय मी आता करू॥ ५॥



अभंगामागची भूमिका :-
भगवंताची भेट कशी होईल असे प्रत्येक भक्ताला वाटतेह्याचे कारण म्हणजे मनामधे भगवंत आहेच व तोच मला सर्व दु:खातून सोडवेल ही मनाची खात्री म्हणजे भाव भक्ताच्या मनामधे असतोभाव याचा संस्कृतमधला अर्थ हाच आहे की " असण्याची खात्री असणे ". गीतमधे म्हटल्याप्रमाणे फक्त भगवंतच खरा आहे व बाकी सर्व एक भासच आहे ( गीत अ.२ श्लोक १६ ) .असा भाव भक्ताच्या मनामधे असतोच व शिवाय त्याच्या मनामधे भगवंताबद्दल पराकोटीचे प्रेम पण असते.

असा भक्त भगवंताच्या भेटीसाठी व्याकूळ होतो .ही स्थिति येणे म्हणजे भगवंताच्या साक्षात्काराची वेळ जवळ येणे होयसंत तुकाराम महाराजांची अशी स्थिति असताना त्यांनी हा अभंग रचला आहेमहाराजांचे चरीत्र पाहिले की ते अशा स्थितीत होते असे दिसते .

अभंगाच्या अर्थाचे स्पष्टीकरण :-

संत तुकाराम महाराज पांडुरंगाला आर्तभावाने विचारताहेत की हे देवातुझ्यासाठी माझा जीव अगदी वेडापिसा झाला आहेतू कोठेतरी दिसशील म्हणुन नजर सर्व दिशांना भिरभिरत पाहाते आहेतुझी भेट व्हावी म्हणून मी सर्व कांही लोकव्यवहार सोडून दिले आहेतआता मनाला एकच छंद लागला आहे तो म्हणजे तुझे दर्शन व्हावेतू कसा आहेस हे मला माहीत नाहीपण मी तुझ्या रूपाचे वर्णन ऐकले आहे.
आपण सर्व जाणतोच की असे भगवंताच्या रूपाचे वर्णन निरनिराळ्या स्तोत्रांत,भगवद्‍गीतेमधेभगवतामधे आले आहे.)
पण ते रुप कांही मला दिसत नाही आहे व आता माझे डोळे तुझ वाट पाहून थकले आहेतजर माश्याला पाण्याबाहेर काढले तर तो जसा तळमळतो तशीच तळमळ मला तुझ्या दर्शनाची लागली आहेमहाराज शेवटी देवांना विनवितात की "हे देवा तूच ह्यावर उपाय सांग जेणेकरून मला तुझे दर्शन होईल.”

अभंगाची शिकवण :-

ह्या अभंगाचा उद्देश आत्मपरीक्षणा करताच आपल्याला करता येतोआपण स्वत:चे अंत:करण तपासुन समजू शकतो की आपल्याला खरेच अशी भगवंताच्या भेटीची तळमळ लागली आहे कां?
परमार्थामधे असे आत्मपरीक्षण करणे महत्वाचे आहे.

गीताप्रेस गोरखपूर द्वारा श्रीतुकाराममहाराजांची  गाथा अभंग क्र.१०८६  पृष्ठ २०६ वर तृतीय क्रमांकाचा अभंग .
-        ज्ञानदा
-        Radharaniji.blogspot.in



Sunday, 25 September 2016

साधूनीं बचनाग खाती तोळातोळा - संत तुकाराम महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||


साधूनीं बचनाग खाती तोळातोळा । आणिकांते डोळां न पाहवें ॥ १ ॥
साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कांपती देखोनियां ॥ २ ॥
असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥ ३ ॥

English  Meaning: 
There are some sages who eat the poison "Bachanag " in small quantities; but there are the other people who are afraid of even watching this action.|| 1 ||
Some persons hold poisonous snakes with their bare hands; while some tremble with fear when they see a snake.|| 2 ||
Tuka says that it is possible to perform / do impossible tasks, because of practice|| 3 ||
Back ground Information for the understanding of this Abhanga.In this abhanga Sant Tukarama is telling us what is the importance of practice in our life.
There are two different areas where practice is important.
1) For material welfare.
2) For spiritual uplifting.
Practice for any task involves following aspects to be addressed.
1) Planning: We have to plan for our practicing a task.
Planning requires that we address all the elements such as time, place, frequency, methods.etc 
2) Patience: one need to have patience since practicing require one to do certain tasks repeatedly. 
3) Adherence to a schedule : One also should adhere to specific time at which the task is practiced.
4) Monitoring: One also need to monitor what one has achieved.
It is obvious that the teachings  are both for our Material welfare and as well as for our spiritual up-lifting.
One has make a choice for "What one  wants".However the  Best choice  is to make the choice for both and then put the teaching into practice.
a) Teaching of this Abhanga for material welfare :
A recently published  book authored by one british author Gladwell says
that if one puts approximately 10000 hours of work in practice then such person becomes an expert/ an authority in the field in which he /she has practiced for 10000 hours or so.
Additionally if he is lucky then such person also gets  name and fame in the world. The book gives the examples of  Bill Gates, and likes to prove his point of view.
There are many books on the aspects of Practice for practice in for the material welfare.
One has to put repeated Efforts i.e. practice then nothing is impossible to achieve is the message here.
b) Teaching of this Abhanga for spiritual  welfare :
All the saints and sages have advised that one should keep on doing  the process of Shravana
(श्रवणं ), manana (मनन ) and Nididhyasa (  निदिध्यास )  continuously.
Shravana covers reading various books such as Bhagvadgita, Upanishads, etc. It also covers the discourses given by the authorities .Only shravana is not sufficient. One must contemplate on what one has heard or read.This is manana.
When we understand the concepts these are to be put to use i.e. practiced in our daily life.
The Maya of Bhagawanta is so powerful that it always tries first to divert our mind from the chosen path. But the same Maya takes us towards GOD also when we have Faith( श्रद्धा )  in HIM and are ready to wait (सबुरी ).
an example : The square root of 2 = 1.44 is what we think.
Actually the student of mathematics knows that the value is 1.44....... More the number of digits after the decimal point, more accurate we are toward the true value. The final number is the Ultimate singular one. Our search of " WHO AM  I " " What is my true Nature? " " How will I get freedom from the cycle of Birth-Death ? all these questions need continuous efforts .That is why one has to have the two qualities namely 1) Faith  ( श्रद्धा )  in HIM and are ready to wait (सबुरी ).
The size of efforts is more for the spiritual goal of Liberation ( मोक्ष ).
However if our way of life becomes the one described in the explanation  in our previous abhanga then the effort  does not remain effort but one enjoyes doing it.
This is what I have understood from this abhanga. - Dnyanada


below given is the Marathi version  for the same explaination


साधूनीं बचनाग खाती तोळातोळा । आणिकांते डोळां न पाहवें ॥ १ ॥
साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कांपती देखोनियां ॥ २ ॥
असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥ ३ ॥
अभंगाचा शब्दार्थ :
कांही साधू बचनागासारखे विष तोळा तोळा खातातपण त्यांचे हे खाणे सुद्धा कोणाकोणाला पाहावत नाही.
कांहीजण नागाला हातांत धरतात तर कांहीची नागाला पाहूनच बोबडी वळते.
ह्या लोकांना असाध्य तेच साध्य होते कारण म्हणजे त्यांचा सतत अभ्यास हेच आहे असे तुकाराम महाराज म्हणतात.
अभंग समजण्यासाठी लागणारी आवश्यक अशी कांही माहीती :
ह्या अभंगामधे संत तुकाराम महाराज आपल्याला अभ्यास करातांना सराव म्हणजेच तीच गोष्ट पुन:पुनकरावी लागते त्याचे महत्व सांगत आहेत.
सरावाचे महत्व व्यवहारामधे तर आहेच पण परमार्थामधेही सराव मह्त्वाचा आहे.
अर्थांत १सराव प्रपंचात करावा लागतो     परमार्थामधेपण पण सराव महत्वाचा आहे.

सराव करायचा म्हणजे खालील बाबींचा विचार करावा लागतो.

योजना तयार करणेजे काम करायचे ते कसेह्याची योजना करायला पाहिजेह्या साठी आपल्या जवळ काय काय सामग्री आहे,कोणती सामग्री केंव्हा लागेलकोठून मिळेलकिती वेळ लागेल,कितीवेळा सराव करावा लागेल ईत्यादी सर्व बाबींचा विचारयोजना तयार करतांना करावा लागतो.

सबूरी : कांही कामे अनेक वेळा करावी तेव्हाच नीट करण्य़ाची सवय होतेत्यासाठीच सबूरी महत्वाची असते.

योजने प्रमाणे ठरलेली कांमें त्याच वेळेला करणे मह्त्वाचे असते.

चाळणा करणेयोजनेत ठरविल्याप्रमाणे कार्य होते आहे की नाही हे सुद्धा वेळोवेळी तपासणे मह्त्वाचे असतेत्यामुळे जर कांही अडचणी आल्या तर त्यांवर उपाय वेळेवरच करता येतो.

ह्या अशा पद्धतीने योजना करण्यालाच समर्थ रामदासांनी "दीर्घसूचना " हा शब्द वापरला आहे.
तुकाराम महाराजांना पण हेच अभिप्रेत आहे.
ह्या वरून एक गोष्ट लक्षांत येते की तुकाराम महाराजांचा उपदेश पण व्यवहारामधे तसेच परमार्थामधे यशस्वी कसे होता येईल त्याबद्दल मार्गदर्शक आहे.
व्यवहारामधे यशस्वी होण्यासाठीचा उपदेशाचा भाग खालील प्रमाणे आहे.
नुकतेच एक पुस्तक एका ब्रिटिश लेखकाने लिहिलेले प्रसिद्ध झाले आहे.पुस्तकाच्या लेखकाचे नांव आहे "ग्लॅडवेल". लेखक म्हणतो की जर एखाद्याने १० हजार तास सराव केला तर अशा माणसाला ज्या विषयाचा सराव केला त्या विषयांत प्राविण्य मिळतेलोकांमधे त्या विषयाचा तज्ञ म्हणून मानमान्यता मिळते याशिवाय जर नशीबाची साथ असेल तर मग विषेश प्रसिद्धी पण मिळतेपुस्तकामधे "बिल गेटयांच्या सारख्यांची उदाहरणे दिलेली आहेत व १०हजार तासांच्या लेखकाच्या सिद्‌धांताला पुरावा म्हणून ही उदाहरणे आहेत.
व्यावहारीक जगामधे यश मिळावे ह्यासाठी मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तके आहेत.
ज्याल यश हवे त्याने न थकता सतत सराव करावा व जो असे करेल त्याला अशक्य असे कांही नाही हाच संदेश येथे मिळतो.
परमार्थामधे यशस्वी होण्यासाठीचा उपदेशाचा भाग खालील प्रमाणे आहे.
आपल्या सर्वच संतजनांनी “ श्रवण क्रिया “ सतत करावी हाच मुद्दा अनेक ठिकाणी मांडला आहेह्यात श्रवणमनन व निदिध्यास ह्यासर्वांचा समावेश आहे.
श्रवणामधे भगवद्‍गीताउपनिषदेईत्यादी सद्‍ग्रंथांचे वाचन येतेतसेच मान्यवरांची प्रवचने कीर्तने ऐकणे हे पण येतेपण फक्त ऐकणे पुरेसे नसते तर ऐकलेल्यावर स्वतविचार करणे , सखोल दडलेला अर्थ शोधून काढणे हे पण महत्वाचे असते.

ह्यानंतर जे समजले ते वर्तनांत आणणे हवेतरच श्रवणाचा उपयोग होईल.भगवंताची माया शक्ती ही एवढी शक्तिमान आहे की ती आपले मन सहजपणे इतर ठिकाणी नेते व आपल्याला पथभ्रष्ट करतेपण हीच माया जर आपली श्रद्धा अढळ असली व आपल्या मधे सबूरी असेल तर आपल्याला भगवंताकडे पण नेते.
एक गणीतांतले उदाहरण येथे घेता येतेआपल्याला माहीत आहे की २ चे वर्गमूळ १.४४ आहेजो गणीताचा अभ्यासक आहे त्याला हे माहीत असते की हि संख्या १ .४४..... अशी अहेजितके पुढे पुढे जाल तेवढी वर्गमूळाची किंमत जास्त खरी व बरोबर होत जातेकिती पुढे जायचे ह्याला मर्यादा नाही.ह्याच प्रमाणे " परमार्थात "मी कोण आहेमाझे खरे स्वरूप काय आहे?मला ह्या जन्ममृत्यु चक्रामधून कशी व केंव्हा सुटका मिळेल? “ ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतातभगवंतावर श्रद्धा असावी लागते व कधीनाकधी माझी त्याची भेट घडणारच आहे व मी वाट पाहायला तयार आहे ही सबूरी पण लागते.
जेवढे प्रयत्न व्यवहारामधे यशस्वी होण्यासाठी लागतात त्यांपेक्षा कोटीपट प्रयत्न परमार्थामधे यशस्वी होण्यासाठी लागतात.
मला ह्या अभंगामधून हीच शिकवण दिलेली आहे असे वाटते. - ज्ञानदा 

- Radharaniji.blogspot.in

कुमुदिनि काय जाणे तो परिमळ - संत तुकाराम महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||


कुमुदिनि काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगितसे ॥ १॥
तैसे तुज ठावें नाहीं तुझे नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणॊं ॥ २॥
माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नचे जोडी त्यासी कामा ॥३॥
तुका म्हणें मुक्ताफळ शिंपीपोटी । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥ ४॥
English Meaning:- The Flower does not have knowledge about it's fragrance, but the bee enjoys it || 1|| Similarly O'God is your name. Only we disciples enjoy it's flavor || 2|| Mother ( Cow) does not have an idea abut the sweetness of her milk, only the child (calf) know it's sweetness|| 3|| Tuka says that a Pearl is born in a shell, but the shell does not know it's value || 4|| Background of the Abhanga:- Tukaram Maharaj is himself a devotee of the Lord ( Panduranga) . He is not able to think anything other than his loved God. He has experienced the God and is telling us here; the importance of the Holy name of God through this Abhanga. Meaning of the Abhanga :- None of us know the true nature of God. However the holy name of our God establishes a link between Him and us. The person who is thus dipped in the love of God , o0nlky can experience the indescribable Bliss. Tukaram Maharaj is explaining the above point by siting threeexamples in the abhanga. In the first Stanza the example of a flower is given. The Lotus flower has fragrance and honey but it is unaware of the same. However a bee can smell it from a large distance and enjoys thetaste of honeydew the flower. Similarly, the holy name of God issweet for the disciples . They recite it and enjoy the act ofrecitation. In the third stanza the example of a mother is given. Every mother is blessed with the gift of Milk for feeding her infant child. The mother ( cow) produces the sweet milk from the tasteless grass eaten by her. However her milk is sweet but the cow does not know the taste of her own milk but the child ( calf) know the same. It enjoys the sweetness of it'smother's milk. In the fourth stanza the example of a pearl is given. The formation of pearl takes shape only when there is rain and also on the presence of a specific position of planets in the Swati. Under these rare conditions only the formation of a pearl takes place in the shell. The shell is however, unaware of the value of the Pearl . Also only the connoisseur Lady who is fond of Pearl bedecked jewelery; understands the value of a real Pearl. In all the above three examples ; there is a common thread .There is pair of the thing ( flower, Cow, See shell) and it's special characteristic like Fragrance, Sweetness and Value. Here the thing in which these characteristics are present ; is itselfnot aware of the same. Like a Bee which comes from long distances; the God takes Human form ( Avatar) for the sake of His devotees. Tukaram Maharaj himself is a seer and liberated person. He is able to establish a direct dialog with the God.( We can not do this) . By giving the above three examples , he is bringing out the importance of the saints like him. He says to the God in this abhanga “ You may not be aware of theimportance of your holy name , but we your devotees are fully aware of it. If we were not there to worship you, nobody would have understood the importance of you holy name.” Teachings of this Abhanga :- This Abhanga brings out the importance of the holy name of God. As given in all the three examples the value of the characteristic such as flvour, smell, sweet taste, value in market for a Pearl are important only for those who are desirous of having the Honey, milk, and the pearl itself. (Bee gets attracted by fragrance of flower and wants the honey, Child wants the sweet milk of it's mother, etc.) Similarly the devotee of God is has attraction of his holy name. Devotees run , rush to the place where Gods name is being recited in order to enjoy the Bliss . This love for the holy name of God comes to those who love Him without any returns or expectations. Let us hope to reach this state. For this recitation of His name will help. With that will come the benefits automatically. It is well known that the saints who have followed this path and reached the state of liberation.( Pure Bliss). - Dnyanda
कुमुदिनि काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगितसे ॥ १॥
तैसे तुज ठावें नाहीं तुझे नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणॊं ॥ २॥
माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नचे जोडी त्यासी कामा ॥३॥
तुका म्हणें मुक्ताफळ शिंपीपोटी । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥ ४॥
अभंगाचा शब्दार्थ :- कुमुदिनीला स्वत:च्या सुगंधाची जाणीव नसते , पणे भुंगा त्याचा आस्वाद घेतो ॥ १॥ त्याच प्रमाणे भगवंता तुझे नाम आहे. नामघेण्याचे प्रेमसुख आम्हालाच माहित आहे ॥ २॥ गाय बेचव गवतखाते व गोड दुध देते. आईला( गाईला) आपल्या दुधाची गोडी काय आहे ते अनुभवता येत नाही. ते दूध अमृतासारखे गोड आहे हे बाळालाच कळते. ॥ ३॥ तुका म्हणतो की मोत्याचा जन्म ज्या शिंपल्यात होतो त्याला त्याचे मोल कळत नाही ॥ ४॥
अभंगाच्या मागची भूमिका :- तुकाराम महाराज हे स्वत: पांडूरंगाचे अनन्य भक्त आहेत. ह्या भगवंताला जाणणारे आहेत. ते आपल्याला स्वानुभवाव रून नामाचे महत्व ह्या अभंगाद्वारे स्पष्ट करताहेत. अभंगाचे अर्थस्पष्टीकरण :- भगवंत कसा आहे ते आपल्याला माहीत नाही . त्याचे नामच त्याच्याशी आपल्याला जोडणारा दुवा आहे. नामस्मरण करणारा भक्तच भगवंताच्या नामाची गोडी अनुभवत असतो. हाच मुद्दा स्पष्ट करण्यासाठी तुकाराम महाराजांनी तीन दृष्टांत ह्या अभंगात दिले आहेत. पहिल्याच चरणामधे महाराजांनी कुमुदिनि म्हणजे कमळाच्या फुलाचे व भुंग्याचे उदाहरण दिले आहे. साधारणता: हा दृष्टांत विषय व त्यांच्यामागे धावणारे मन ह्यांसाठी दिलेला आढळतो. कुमुदिनी म्हणजे चंद्राच्या दर्शनामुळे उमललेले शुभ्र रंगाचे कमळ अर्थात दृष्य विश्व. व त्यामधे असणारे विषय. आपल्या पंचेद्रियांना आकर्षित विषयांकडे आपले मन धाव घेत असते. मनाला भुंग्याची उपमा आहे. मन एकाविषयाकडून दुसरीकडे सतत जात असते. पण हाच दृष्तांत येथे वेगळ्या अर्थाने घेतलेला आहे. येथे कुमुदिनी म्हणजे सगूण भगवंत व भुंगां म्हणजे ज्याला उपरती झाली आहे असा साधक. भक्त . भगवंताचे नाम हाच परीमळ , कमळाचा सुगंध ह्या अर्थाने हा दृष्टांत महाराजांनी येथे दिलेला आहे कमळामधे सुगंध व मकरंद दोन्ही आहेत. खरेतर कमळाचा सुगंध त्याच्यापासून वेगळा नाही. भगवंत व त्याचे नाम पण तसेच एकच आहेत. कमळाला स्वत:च्या सुगंधाच्या ताकदीची मात्र यत्किंचितही जाणीव नसते. पण भुंग्याला हाच सुगंध दूर अंतरावर कळतो व तो कमळाकडे येऊन मकरंदाचा आस्वाद घेतो. अगदी असेच भगवंताचे नाम आहे. जेथे नामसंकीर्तन सुरू असेल तेथे भक्त धाव घेतात व त्या नामसंकीर्तनाचा आस्वाद घेतात आणी ब्रह्मानंद भोगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामधे दुसरा दृष्टांत येतो. येथे आई म्हणजे गाय. गाय गवत खाते व त्या बेचव गवताचेच गोड दुध तयार होते. अर्थात गाईला ( तुकाराम महाराज म्हणतात तसे) त्या दुधाची गॊडी तिला कळत नाही. पण तिच्या बाळाला म्हणजे वासराला मात्र ह्या गॊडीची जाण असते. तद्वतच नामाला स्वत:ची गोडी भक्तांच्या भगवंतावरच्या अनन्य प्रेमभावामुळे येते. अभंगाच्या चौथ्या चरणांत तिसरा दृष्टांत आहे. या ठिकाणी महाराजांनी शिंपल्यात तयार होणाऱ्या मोत्याचे उदाहरण दिले आहे. स्वाती नक्षत्रावर पाऊस पडला व अशा पावसाचा थेंब जर शिंपल्यात पडला तरच त्याचा मोती तयार होतो. सापाच्या मुखांत तोच थेंब पडला तर त्याचे विष होते.असा हा मोती तयार होण्याचा योग तसा दुर्मीळच असतो. पण शिंपल्याला आपल्या जवळच्या मोत्याची किंमत कळत नाही . जिला दागिने घालण्याची हौस आहे , त्या रसिक स्त्रीलाच मोत्याची खरी किंमत कळते. ह्या तिनही दृष्तांतांमधे एक धागा आहे. तो म्हणजे " ज्याची नये जोडी त्यासी कामा ". वैशिष्ठ्य हेच की ज्याला ज्याची जोडी आहे त्याला स्वत:ला त्याचा कांहीच उपयोग नाही. स्वता:मधल्या वैशिष्ठयाचे महत्व ,गोडी कळत नाही. भुंगा जसा सुगंधासाठी दुरून धावून येतो तसाच भगवंत आपल्या भक्तांसाठी अवतार घेतो , अव्यक्तामधून सगुणात येतो. असे त्याचे भक्तांवर प्रेम आहे. तुकाराम महाराज हे संत आहेत. ते भगवंताशी ते संवाद साधू शकतात.म्हणून वरील दृष्टांताद्वारे ते संतांचे महत्व पण सांगताहेत. ते म्हणतात की हे पांडूरंगा असाच तुझ्या नामाचा महीमा आहे. तू कदाचित जाणत नसशील पण आम्ही संत नामचा महिमा जाणतो. तसेच जर आम्ही संत नसलो तर हे भगवंता तुझ्या नामाचे महत्व , महीमा कोणाला कळले नसते. अभंगाची शिकवण :- हा अभंग नामाचे तसेच संतांचे महत्व सांगणारा आहे. जसे अभंगातल्या सर्व उदाहरणा मधे दिलेले सुगंध, गोडी, मोल हे त्या त्या वस्तूमधील (कमळाचे, दुधाचे, मोत्याचे ) वैशिष्ठ्य आहे. त्याचे आकर्षण भुंगा, वासरू व जाणत्या स्त्री ह्यांना आहे भगवंताचे नाम हे असेच आहे. त्याच्या नामाचे प्रेम भक्तालाच असते. अर्थात शिकवण हीच की नामस्मरण करावे व संतांच्या सारखा नामस्मरणाची गोडी अनुभवावी . - ज्ञानदा
:-  Radaharaniji.blogspot.in