Sunday, 16 October 2016

मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥

|| ज्ञानेशो भगवान विष्णु: ||

घेईं घेईं माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१ ॥
तुम्ही घ्यारे डोळॆ सुख । पहा विठोबाचे मुख ॥ २॥
तुम्ही आईकारे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥ ३ ॥
मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥ ४॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥ ५॥


मराठी व इंग्रजी निरुपणासहित

Verbatim Meaning :-

O' my tongue, recite the sweet name of Vithobaa ( Panduranaga)|| 1||
O' my eyes, enjoy the sight of Vithoba|| 2 ||
O'my ears , listen to the the praise of Vithoba || 3||
O' my mind go and seek the holy feet of Vithoba|| 4||
Tuka says O' man , do not forget this Keshavaa || 5||

Back ground Information :-

We have seen in our earlier Abhangas that most of our saints have said that reciting the holy name of God is the best way.( This is Namasmaran Bhakti ie. Worship of God thru recitation of His name).
Incidentally some of our seers and saints ( Samarth Ramadas swamy , Vasudevanand Saraswati of Garudeshwar to name a few) have told very clearly that “ if one recites the name of God 3and1/2 crore times then the person will have the vision of God in the dream state, ” and 13 crorerecitation will lead to vision of God in the waking stateleading to Liberation.

But both these numbers are very large numbers . Many of us have turned to Spirituality in our late age only. A physical check to know time to be spent to recite even a Crore indicates that one will be required to recite the name for 5 hours a day; then only in about 6 years he will be able to reach the figure of 1 crore. Thus we will needaround 66 years to complete the figure of 13 crorerecitations. This definitely is a very uneasy situation.

Thus one gets a feeling that this path is also very difficult to tread upon since we have to pay attention to our worldly duties for our and our Family’s welfare and survival..

However this conclusion is not correct. We have seen that it is the attitude of mind that needs to be changed.
Like some earlier Abhanga this one too gives us guidance to resolve the issue satisfactorily .
It brings out a point that we should use our all five sense organs in the specific fashion described in the abhanga. This can be done without causing any interference with our task of performing the worldly duties.

Meaning of the Abhanga:-
1st stanza : Here Tukaraama maharaj is saying that his tongue should recite the name of God alone. This has some what deeper meaning. We can speak verbally',and mentallytoo. Verbal speech is for communication with the other beings and as long as we are in this world we have to communicate with others sometimes or the other. If we see the presence of God in others and remembering this aspect speak with them without any harshness , then evenall the verbal speech is like reciting the holy name of God. The speech should be without any anger, contempt etc is therefore important. Sweet speech will get the answers is sweet speech in return .
2nd stanza:- Here Maharaj says that he should always see the smiling face of his Panduranga. Panduranga is another name of Lord Krishna. We must remember that the wholeworld is filled with Him only. Thus whatever we see it is a manifestation of the Lord. This is also the preaching of the Ishopanishad .
3rd stanza:- Here Tukarama maharaj is saying that his ears should always listen to the praising word about the lord. This means we should avoid the places where violence is present and harsh words are being exchanged. As said in the 1st stanza we have to also avoid harsh speech since it can give us pain if other party is hurt and retaliates with harsh words.
4th stanza & 5th Stanza:- Here maharaja says that his mind should go where-ever his Lords' holy feet are seen and advises his mind that it should not forget “This LordKeshava” at all.
In this stanza he specifically has used the word “ This” to address his God. It means that he himself is experiencing the presence of the Lord.
The last line also indicates that the complete abhanga is meant as a preaching for those who have yet not experienced the presence of God.

One similar verse is available in the Shivamanasapuja Stotram. ( Stotram mean words of Praise of the God written in Poem forms) It is as follows.
आत्मा त्वं गिरिजा मतिसहचरा प्राणाशरीरंगृहम्‌ ।
The Chaitanya residing in the body is nothing but You (Shiva) The Intellect is your associate Girijaa ( Parvati) and the body itself is the house where they are residing.
पूजा ते विविधोपभोगरचना निद्रा समाधि:स्थिति:
Various enjoyments by the five sense organs is the Worship (of this Shiva) and state of Sleep is the perfect absorption of the mind into the Supreme Spirit.
संचारपदयोप्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरो ।
All the movements are nothing but the circumambulation ( done as reverential salutation to God) and all the speech is nothing but the praise (of You O'Shiva)
यद्यत्कर्म करोमि तत्त्दखिलं शम्भो तवाराधनम्‌ ॥
Whatever action I do is thus being done as a worship to you O'Shiva.

This verse aptly describes how the attitude of seeker for the liberation should be. Tukarama maharaj has described the same by coupling the same with his own experience . This also show How a liberated person lives in this world.

Teaching of the Abhanga:- This abhanga teaches us the following aspects
1.  How to interact with the world.
2.  The main basic point is to treat everybody, and everything as a form of God.
3.  Always talk by giving due respect to the other persons.
4.  Treat the envoirnment as God and do not spoil it by misuse.
5.  Do every action as worship to the God and accept the outcomes as the will of God
And be happy in all the circumstances.

- Dnyanda 

मराठी भाषेतील निरुपण : -

घेईं घेईं माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१ ॥
तुम्ही घ्यारे डोळॆ सुख । पहा विठोबाचे मुख ॥ २॥
तुम्ही आईकारे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥ ३ ॥
मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥ ४॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥ ५॥

अभंगामागची भूमिका :-
आपण आधिच्या अभंगाचा अर्थ समजून घेतला तेंव्हा पाहिलेच आहे की सर्वच संतांनी नामस्मरणावर भर दिलेला आहेसंत रामदासस्वामी , वासुदेवानंद सरस्वती ( गरुडेश्वर येथीलयांनी तर हे ही सांगितले आहे की " जर एखाद्याने ३ १/२ कोटी जप केलातर त्याला स्वनामधे व जेंव्हा १३ कोटी पूर्ण होईल तेंव्हा प्रत्यक्ष जागृतावस्थेतच भगवंताचा साक्षात्कार होईल.

ह्या दोनही संख्या खूप मोठ्या वाटतातआपल्यापैकी बरच जण वयाच्या ५०-५५ नंतर अध्यात्माचा शोध घ्यायला लागलो आहोतजर रोज ५ तास जप केला तर १ कोटी जपसंख्या पूर्ण होण्यास ६ वर्षे व १३ कोटीस ६६ ते ७० वर्षे लागतीलम्हणजे ह्याजन्मी मोक्ष अशक्यच आहे असे वाटेलह्याचे कारण म्हणजे आपल्याला संसाराची कामे सोडून फक्त जप करत बसावे लागेलपण असे वागणे नक्कीच घातकच असते ह्यात संशय नाही

पण आता वेळ थोडा हे असे वाटणे चूकच आहे.
मागे पाहिलेल्या प्रमाणे हा अभंग आपल्याला काय उपाय करायचा तेच मार्गदर्शन करतो आहेतो उपाय अभंगात सविस्तर रीत्या दिलेला आहे.सारांश खालॊ देत आहे.
मनाची एक विषिष्ट तयारी फक्त असायला हवी आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना व मनाला ताब्यात ठेवणे जर केले तर आपली प्रपंचातली सर्व कामे करूनसुद्धा परमार्थ साधता येईल.

अभंगाच्या अर्थाचे स्पष्टिकरण :-
१ला चरण:- सर्वप्रथम महाराज म्हणतात की त्यांच्या वाचेने भगवंताचे गोड नांव घ्यावेह्याला बराच सखोल अर्थ आहेआपण वैखरीत ( ईतरांना बोलणे ऐकू येईल असे म्हणजे संवाद करत असतान ) नेहमी बोलतोतसेच मनातल्या मनात पण बोलतोजर सर्वांभूती भगवंत आहे हे मनास पटले तरच आपले इतरांबरोबरचे बोलणे गोड होईलअसे बोलणे म्हणजेच " विठोबाचे गोड नाव घेणे होयकधीही कोणालाच राग आला असला तरिपण कर्कशमनाला जखम करणारे , उद्वेग वाटेलदु:ख होईल असे बोलू नये हेच येथे सांगितले आहेत्यामागची भूमिका : सर्वांभूती भगवंत पाहाणे हीच असायला हवी.
२रा चरण;:- ह्याठिकाणी महाराज म्हणतात की त्याना सतत सर्वत्र स्मितहास्यकरणारे विठोबाचे मुख दिसावेविठोबा म्हणजेच पांडुरंग.हे भगवान श्रीकॄष्णांचेच एक नांव आहेहे सर्व जगत्‌ भगवंतानेच व्यापले आहे असे ईशोपनिषद सांगतेसर्व संतांच पण हाच स्वानुभव आहेअशी दॄष्टी ठेवली की सर्व जगत आनंदमय आहे हेच अनुभवास येतेअशी जगाकडे पाहण्याची दॄष्टी असावी हेच येथे सांगितले आहे.
३रा चरण :- ह्या चरणामधे तुकाराम महाराज म्हणतात की त्यांच्या कानांनी भगवंताचे गुंणवर्णन ऐकू येवोअसे गुणवर्णन जेथे चालू असेते तेथे कोणतिही भांडणे , वादविवाद , आरडओरडा नसतो.थोडक्यांत म्हणजे जेथे वाचेने गोड शब्द आहेत ते भगवंताचे कीर्तनच जणू असते.
जरा विचार केला तर असे म्हणता येते की गोड बोलण्याने दुसîrÉÉच्या अंतरात्म्यास आनंदच होतो म्हणजेच असे गोड बोलणे हे भगवंताचे कीर्तन कां म्हणता येते ते पटू शकते.
तुकाराम महाराजांना हेच येथे बहुतेक सांगायचे आहेनिदान मला तरी असेच वाटते.

४था व ५ वा चरण :- येथे तुकाराम महाराज सांगतात की त्यांचे मन सतत भगवंताच्या पाय़ांशी राहो " ह्या केशवाला कधीही सोडू नकाअसा उपदेश पण त्यांनी केलेला आहे.
येथे त्यांनी " हा केशव " हे शब्द वापरून आपल्याला हेच सांगितले आहे की ते भगवंतास प्रत्यक्ष सतत बघत आहेततो आहेच हेच सत्य आहे हे येथे ठासून सांगितले आहेह्याचाच अर्थ हा पण आहे की हा संपूर्ण अभंग ज्यांना भगवंताच्या भेटीची आंस लागली आहे त्यांना मार्गदर्शनासाठीच जणू लिहिलेला आहे.

जवळपास ह्याच अर्थाचा एक श्लोक शिवमानसपूजेमधे आहेतो खालीलप्रमाणे आहे.
आत्मा त्वं गिरिजा मतिसहचरा प्राणाशरीरंगृहम्‌ ।
पूजा ते विविधोपभोगरचना निद्रा समाधि:स्थिति:
संचारपदयोप्रदक्षिणविधि: : स्तोत्राणि सर्वा गिरो ।
यद्यत्कर्म करोमि तत्त्दखिलं शम्भो तवाराधनम्‌ ॥

श्लोकाचा अर्थ :- हे शिवा ! तूच शरीरस्थ आत्मा आहेस . बुद्धी हीच पार्वती आहे व शइर हेच त्यांचे राहण्याचे ठिकाण आहेदेहाने पंचइंद्रियांद्वारे घेतलेले भोगच तुझी पूजा आहेनिद्रा हीच समाधीची स्थिती आहेपायाम्नि केलेला संचर हीच जणू तुला घातलेली प्रदक्षीणा आहेजे जे बोलणे घडले तीच तुझी स्तुती आहेहे शिवा मी जे जे कर्म करतो आहे ती तुझी आराधनाच आहे.

तुकाराम महाराजांनी स्वानुभवावर आधरित अभंगामधे हेच वेगळ्या शब्दांमधे लिहिले आहे
जीवन्मुक्त व्यक्ती जगामधे कशी राहते त्याचेच हे वर्णन आहे असेही म्हणता येईलअसो.

अभंगाची शिकवण :- खालीलप्रमाणे आहे.
जगाशी कसे वर्तन असावे .
सर्वांभू ती भगवंताअस पाहावे व तसे वागावेह मुख्य मुदा आहे.
सर्वांशीच आदराने , प्रेमाने बोलावे.
सर्व सृष्टी भगवंतच आहे म्हणून वस्तूचे नुकसान करू नये.


प्रत्येक कार्य भगवंताची पूजा असे समजूनच नीट करावे.


- ज्ञानदा 

- radaharaniji.blogspot.in 

Wednesday, 12 October 2016

तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐंसे ते भजन पार पावी ॥

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||

करावी तें पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असें ॥ १ ॥
कळावें तयासी कळे अंतरिचे । कारण ते साचे साच अंगीं ॥ २॥
अतिशयाअंतीं लाभ किंवा घात । फळ देते चित्त बीजाऐसे ॥ ३ ॥
तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐंसे ते भजन पार पावी ॥ ४ ॥


इंग्रजी तथा मराठी या दोन्ही भाषेतील निरुपणासमवेत

English   Meaning :

One should rather perform worship in mind. (मानसपूजा Then there is no need for the ritualistic worship . || 1||
Such a worship , done with full concentration of mind is the true worship | When one worships God like this then He knows this ( because He can understand the thoughts in the mind.)|| 2 ||
Any activity when done intensely ; results (gives) either some benefits or some Losses., it all depends upon what the intention is there in the mind || 3||
Tuka says that one should do the worship which give satisfaction to the mind . Such worship results in Liberation|| 4 ||

Back ground Information:

Generally when a person understands meaning of some major attributes of God such as (Omniscient, Omnipresent, Omnipotent सर्वज्ञ ,सर्वव्यापीसर्वशक्तिमान, ), then one looks upon the God as His Father, or Mother or Friend, or Child, or Lover as per the likes of the individual. The relationship thus develops between the devotee and the God. It is not possible to imagine the God without form( निर्गूण ) and therefore it is one does the worship of the Form of God he/She most likes. ( Such Srirama, Srikrishna, Goddess Lakshmi , Swastika, , etc ) Sri.Ramakrishna Paramhansa says that Body and Shadow both are the same.

We have seen earlier that there are Nine ways one can worship the God (नवविधाभक्ति).
One of these is Archanbhakti ( अर्चनभक्ती) in which the devotee worships the God in some form .Here the devotee offers to his God all that generally is offered to a VIP( Very Important Person) when such a VIP visits the house.

This is a popular form of Image worship .(मूर्तीपूजा) , sometimes the images are replaced with symbolic objects such as  , shaligramaa, shivalingaa etc. In our country many families have the practice of performing the worship daily . One major advantage is that , we at least remember Him during this worship.
To perform the worship our Shastras have prescribed some specific method namely Worship with 16 steps,षोडशोपचार पूजा ) The . There is a shorter version in which five steps are followed..(पंचोपचार पूजा) .However we need many material objects such as flowers, Lamp, Incense Sticks, Betel leaf and nut, cloths, etc. and of cource the food articles. This type of worship is External and is said to be necessary since it leads to concentration. When the concentration becomes deep then external rituals drop off themselves .
Internal worship is called (मानसपुजा)manasapuja. It is actually meditation which may be a simple process of contemplation on the God with form.
Sant Tukarama is praising this form of worship in this abhanga.

Meaning of the Abhanga:

In the beginning itself Sant Tukarama Maharaj is saying that Manasapuja is better . It does not require any external objects. All one has to do is contemplate on God.
He further says that God knows what is there in your mind. He will give you whatever you want . ( However , we must remember here that there is a need of complete surrender to Him. Then only it becomes clear and accepted by our mind that all that happens is for our welfare only.)
The third stanza of this abhanga is very important. Here Tukarama maharaja says that when one prays to the God with intense desires , it may result in getting some benefits, or it may result in some losses. However both are of temporary nature. It is far superior worship where one is not asking anything from our God except love for Him and for all that he has created. Gita calls it ( निष्काम भाव) . It leads to pure satisfaction for the devotee. The devotee then accepts whatever happens around him without getting disturbed. His love for God does not diminish due to problems he faces.
In Srimad Bhagavad gita the Lord has assured that He takes care of such a devotee.
That is why in the last stanza Sant Tukaram maharaj is advocating that this kind of Meditation ( internal worship ) is the best and one should follow it.
-       Dnyanda


MarathI version of the Abhanga  -

करावी तें पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असें ॥ १ ॥
कळावें तयासी कळे अंतरिचे । कारण ते साचे साच अंगीं ॥ २॥
अतिशयाअंतीं लाभ किंवा घात । फळ देते चित्त बीजाऐसे ॥ ३ ॥
तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐंसे ते भजन पार पावी ॥ ४ ॥


अभंगाचा शब्दार्थ :
माणसाने उत्तम पद्धतीने मानसपूजा करावी.त्या साठी कसलीही सामग्री वगैरे लागत नाही ॥ १॥
भगवंताला तुमच्या मनात काय आहे ते सर्व कळतेतो अंतर्यामी आहेतुम्ही पुजा कां करताआहत त्याचे खरे कारण पण तो जाणतो.॥ २॥
जसे चितामधे असेल त्या बिजरूपाप्रमाणे कर्माचे फळ मिळतेअतिशय लोभाचा अंत शेवटी घातच करतो॥ ३॥
तुकाराम महाराज म्हणतात  की असे भजन करा की जेणेकरून तुमच्या मनामधे समाधान राहील.असे भजन्च तुम्हाला भवसागरातून  पार नेईल॥ ४ ॥

अभंगामागची भूमिका व अर्थ स्पष्टीकरणासाठी लागणारी माहिती:

जेंव्हा माणसाला भगवंताच्या कांही मुख्य गुणांचा म्हणजे सर्वज्ञसर्वशक्तीमानव सर्वव्यापी ह्या गुणांचा अर्थ कळतो तेंव्हाच त्याला हे पटते की भगवंताच्या बरोबर आपण कांही नाते जोडून त्याची भक्ती करावीमग माणूस त्याच्या स्वभावानुसार भगवंताशी व्डीलआईसखाप्रियकर असे कोणतेतरी नाते ठरवतो व भगवंताला त्याभावाने पाहातो व हळूहळू हे नाते दृढ होत जातेभगवंत हा खरेतर निर्गूणच आहेपण तो सगूणही आहे.सगून रुपाशीच आपण प्रथम नाते जोडू शकतो.( श्री रामश्रीकृष्णलक्ष्मीदेवी,
स्वस्तिकचिन्हॐकार ईत्यादी सर्व भगवंताची सगूण रुपे आहेत.) श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात की जसे शरीर व सावली ही एकाचीच रूपे आहेत तसेच.

आपण हेहीपाहिले आहे की सगूणाची भक्ति करण्याचे नऊ प्रकारा आहेतत्यांनाच नवविधा भक्ति म्हणतात.
ह्या नवविधाभक्तिंपैकी एकीचे नांव आहे अर्चनभक्तीह्या प्रकारामधे भक्त देवाची पूजा करतोपूजेमधे देवाला ते ते सर्वकांही अर्पण केले जाते जे आपल्याकडे एखादी अत्यंत महत्वाची व्यक्ति पाहूणा म्हणून येते तेंव्हा अशा पाहूण्याला अर्पण केले जातेयेथे आपण भगवंताला त्याच्या मूर्तीमधे पाहतो.
अर्चनभक्ती हा मूर्तीपूजेचा सर्वांत लोकमान्य व सर्वांना आवडणारा असा प्रकार आहे.
कांही ठिकाणी भगवंताच्या मूर्ती ऐवजी ॐकाराचे चित्रशालिग्रामशिवाची शाळुंका शिवलिंगअशी चिन्हरूपेपण देव म्हणुन पूजेला घेतात.
आपल्या देशांत बरच जण रोजच देवपूजा करतातपूजा केलीजाते तेंव्हा कमीतकमी त्यावेळेपुरते काम होईना भगवंताची आठवणस्मरण घडते.

आपल्या शास्त्रांनी पुझेच दोन प्रकार पद्धती सांगितल्या अहेतषोडशोपचार पूजा .ह्या पुजेमधे भगवंताला १६ उपचारानी(आवाहन आसनआचमन , स्नान,अभिषेक धूपदीप नैवैद्यविडा देणे इत्यादि ) पूजिले जातेपंचोपचार पूजा.ह्या पुजेच्या दुसरी पद्धतीत फक्त ५ उपचार केले जातात.

पण दोनही पुजा करायच्या तर निरनिराली साधन सामग्री जसे गंधफुलेदीप,उदबत्तीविड्याचे पान व सुपारीकपडे,इत्यादी व शिवाय नैवेद्यासाठई फळेव भोजनसामग्री हे सर्व लागतेअर्थात पैसा पण खर्च करावा हा लागतो.
ह्या बाह्य उपचारांच्या पुजेच मुख्य फायदा हा आहे की मन भगवंताकडे एकाग्र होते.म्हणूनच जेंव्हा मनाची एकाग्रता ह्या सर्व बाह्य उपचारांविना होऊ लागते तेंव्हा साहजिकच बाह्य उपचारांनी पूजा करणे बंद होते.
ह्या नंतर आपण मनानेच सर्व उपचार करून पूजा करू शकतो.अशा अंतर्यामी केलेल्या पूजेला "मानसपूजा " असे नांव आहेध्यान करणे ही पण एक वेगळ्या पद्धतीची मानसपूजाच असते असे म्हणता येईल.

अभंगामधे संत तुकाराम महाराज ह्या मानसपूजेचेच कौतुक करीत आहेत.

अभंगाचा स्पष्टिकरण करुन अर्थ :
अभंगाच्या सुरवातीलाच तुकाराम महाराज म्हणतात की मानसपूजा करणेच खरतर उत्तम पूजा करणॆ होयह्या पूजेसाठी कांहिही बाह्य सामग्री लागत नाही .लागते ते भगवंताचे ध्यान .

पुढे महाराज म्हणतात की भगवंतास तुमच्या मनामधे काय विचार चालले आहेत ते कळते.तुम्हाला काय पाहिजे आहे ते पण कळतेतो नक्कीच तुम्हाला जे काय आवश्यक असेल ते ते सर्व देईलच ह्याची खात्री बाळगावी. ( पण हे ही लक्षांत घेणे आवश्यक आहे की त्याला अनन्यभावे शरण जायला हवेअशी शरणागती पत्करली असेल तरच तुम्हाला हे पण पटेल की तो जे जे कांही करतो ते तुमच्या भल्यासाठीच करत आहे.) ह्या शिवाय अशी पूजा तुम्हाला मोक्षा कडे पण नेते हा मोठा फायदा आहेच.

अभंगाचा तिसरा व चौथा चरण दोन्ही अत्यंत मह्त्वाचे आहेतयेथे तुकाराम महाराज म्हणतात की जेंव्हा कोणी भगवंताची अत्यंत तीव्रभावाने प्रार्थना करत्तो , तेंव्हा त्याला कांहितरी फायदा हा नक्कीच अनुभवास येतो पन कधीकधी कांहीच फायदा न होता उलट नुकसान झाल्यासारखे भासते.फायदा काय वा नुकसान काय दोनही अशाश्वतचफार काळ न टिकणारे असतात.
त्यापेक्षा वरच्या दर्जाची पूजा म्हणजे भगवंतास कांहीच न मागंणे , त्याच्याकडून कसलीच अपेक्षा न धरता करणे व फक्त त्याच्यावरील प्रेमामुळेत्याच्या सर्व निर्मितीचे कौतुक म्हणून करणे ही होय.भघवद्‌गीतेमधे ह्यालाच निष्काम भावम्हटलेले आहे.
जर पूजा कांही फळाशा धरून केली तर त्या लोभाचे फळ हे मिळेलच पण हा फलाशेचा भावच आपल्याला जन्म-मृत्युच्या फेरी मधे अडकवतो व जन्मोजन्मी दु:खे भोगायला लावतो हे विसरू नये हे अभंगाच तिसरा चरन सांगतो.
असा भाव भक्ताला शाशवत समाधानचा अनुभव देतोअसा भक्त त्याच्यावरआलेल्या कोणत्याही संकटांमुळेविचलीत होत नाही.ट्याचे भगवंतावरचे प्रेम सर्व स्थितींमधे कायमच राहतेकमी होते नाही.
श्रीमद्‍भगवद्‍गीते मधे भगवंतांनी ही खात्री दिली आहे की भगवंत अशा भक्ताचा योगक्षेम स्वतचालवतातह्या कारणास्तव तुकाराम माहाराज अभंगाच्या शेवटच्या कडव्यांमधे अशा आंतरिक मानसपूजेचाच सर्वोत्तम पूजा म्हणुन स्विकार करताहेत.

अशी मानसपूजा आपल्या सर्वांकडून घडॊ हीच भगवंतास प्रार्थना करूया.
-       ज्ञानदा

radharaniji.blogspot.in